नववी ते बारावीची शाळा आता सोमवारपासून सह्याद्री वाहिनीवर
नववी ते बारावीची शाळा आता सोमवारपासून सह्याद्री वाहिनीवर सुरु होणार. या २६ ऑक्टोबर पासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री चायनल वर ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण होणार. ही माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
तुम्हाला माहिती असेल १५ जून पासून आपल्या राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. राज्य सरकार कडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ज्ञानगंगा हा कार्यक्रम चालू होणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी ७.३० सात ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत प्रसारित केला जाणार आहे. राज्यातील शाळा चालू होतील किंवा नाही. हे अजूनही निश्चित नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल असे वरिष्ठाकडून सांगण्यात आले आहे.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हि बातमी नक्कीच खूप महतवाची आहे. आपण इतरांना देखील शेअर करा.
Post a Comment