Translate

अहमदनगर

अहमदनगर व अहमदनगरच्या काही महत्वाच्या


महाराष्ट्रामधील,अहमदनगर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असुन या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17 हजार 48 चौरस किलोमीटर इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार अमदनगर मधील लोकसंख्या ही 45 लाख 43 हजार 83 आहे.


अहमदनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी,सीना,मुळा,प्रवरा,भीमा ढोरा,घोड, या नद्या वाहतात.अहमदनगर मध्ये तांदूळ, ज्वारी, गहू, कापूस, ऊस, मका, मोसंबी, द्राक्षे, इत्यादी शेतकरी उत्पादन करतात.महाराष्ट्रमधील अष्टविनायकांपैकी एक 'सिद्धिविनायक' मंदिर अहमदनगर जिल्ह्यात आहे.शिर्डी व साईबाबा मंदिर, शनि देवाचे मंदिर, शनि शिंगणापूर हे धार्मिक स्थानचे याच जिल्ह्यात आहे.


अहमदनगरच इतिहास व महत्वाच्यागोष्टी.

अहमदनगर शहराचे नाव पहिले शासक अहमद निजाम शहा यांच्या नावावर आहे, ज्याने १ 14 4 in मध्ये रणांगणावर शहराची स्थापना केली.अहमदनगर एके काळी निजामशाहीची राजधानी होती.येथील चांदबीबीचा महाल महाराष्ट्रमध्ये खूप प्रसिद्ध आहे. 'कळसूबाई' हे पर्वतशिखर नाशिक आणि अहमदनगर च्या बॉर्डरवर आहे. इथे दरवर्षी लोक महाराष्ट्रातून आणि इतर दुसर्‍या राज्यातून पण येतात.

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर होय.१९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात पं. नेहरू,वल्लभभाई पटेल व इतर महत्त्वाचे राष्ट्रीय नेते नगरच्या किल्ल्यात बंद करण्यात आले होते. पंडित नेहरूंनी येथेच 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील यांनी स्थापन केलेला प्रवरा नगर येथील देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढण्याचा आणि तो यशस्वीरित्या चालविण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यास मिळाला.

अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा एकूण 7 जिल्ह्यांना सोबत आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर होय. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखरकारखाने आहेत.

अहमदनगरपासून ५६ कि.मी. अंतरावर प्रवरानदीच्या काठी वसलेल्या नेवासे गावात संत ज्ञानेश्वरांनीग्रंथराज 'ज्ञानेश्वरी' सांगितली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव अहमदनगरपासून ६०कि.मी आहे. ग्रामविकासाचे उत्तम उदाहारण म्हणून हे छोटेसे गाव देशभर गाजते. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेकाठी वसलेले दायमाबाद हे स्थळ प्राचीन व ताम्रपाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.


Post a Comment

Previous Post Next Post