ऑलिम्पिक स्पर्धा,स्पर्धांचे पुनरूज्जीवन,संपूर्ण इतिहास UPSC MPSC
ऑलिम्पिक स्पर्धा
ऑलिम्पिक चिन्ह |
ग्रीसमधील ऑलिंपिया या ठिकाणी ऑलिंपिक सामने होत होते , त्यावरून ऑलिम्पिक क्रीडा सामने है पडले. अनेक शतकापासून ग्रीक लोक त्यांच सन म्हणून या स्पर्धा घेत होते. पहिले ग्रीस देशात तत्त्वज्ञान , शिल्प, साहित्य, स्थापत्य , शिक्षण इत्यादी विषयांप्रमाणेच मैदानी व मन्शूबळ शिक्षणावर विशेष भर दिला जात असे. या स्पर्धा सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेल्या 'ईलीस' या राज्याच्या मैदानावर भरविण्यात येत. प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी भरवीत. रोमन सम्राट थिओडोसीम ने या स्पर्धा रानटी संस्कृतीचे निदर्शक म्हणून रद्द केल्या. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा बंद झाल्या.
ऑलिम्पिक स्पर्धा,स्पर्धांचे पुनरूज्जीवन,संपूर्ण इतिहास UPSC MPSC
स्पर्धांचे पुनरूज्जीवन : आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा
६ एप्रिल, १८९६ रोजी एका पावसाळी सकाळी ग्रीसमधील अथेन्स येथे तोफांची सलामी दिली गेली,कबुतरे सोडण्यात आली आणि टाळ्यांचा कडकडाटांच्या गजरात सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धा, 'ऑलिम्पिक गेम्स' चे पुनरूज्जीवन झाले. रोमन सम्राटाने इ.स. ३९३ मध्ये विझविलेली ज्योत पुन्हा एकदा पेटविण्यात आली. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. त्यांचे पुनरूज्जीवन होण्यात मुख्यत्वे फ्रान्सच्या बॅरन पीयर- द-क्युबर्टिन या थोर व्यक्तीचा महत्त्वाचा वाटा होता.
१८९६ मध्ये जवळजवळ १५०० वर्षांच्या खंडानंतर स्पर्धा सुरू करण्यात आल्या. त्याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रातील परराष्ट्रनीतीत सुधारणा व्हावी, हे होते. बॅरन पीयर-द- क्युबर्टिन यांचे असे मत होते की, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील हौशी क्रीडापटूंमुळे निरनिराळ्या देशातील जनतेमध्ये मित्रत्त्वाची, बंधुत्त्वाची भावना वाढीस लागेल. त्यांच्या अथक परिश्रमामुळे जून,१८९४ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद पॅरिस येथे भरविण्यात आली. म्हणूनच बॅरन पीयर-द-क्युबर्टिनला 'आधुनिक ऑलिम्पिकचा जनक' असे म्हटले जाते.
पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अथेन्स येथे घेण्यात आल्या. ६ एप्रिल, १८९६ रोजी ग्रीकराजा जॉर्ज याने ६०,००० लोकांच्या उपस्थितीत या स्पर्धांचे उद्घाटन केले. तेव्हापासून दर चार वर्षांनी या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याचा सन्मान हा एखाद्या देशाला न देता शहराला दिला जातो.
Post a Comment