रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी ' RTGS 'ला देखील डिसेंबरपासून २४ तास उपलब्ध केले आहे. RTGS हि संकल्पना आपल्यासाठी नवीन असू शकते. आपण हे इतके समजू घ्या कि RTGS हि संकल्पना ऑनलाईन मनी ट्रान्सफरशी संबंधित आहे. तसे ऑनलाईन मनी ट्रान्सफरसाठी NEFT, RTGS, IMPS तसेच UPI पद्धत राहते.यामध्ये फोन पे गूगल पे चे व्यवहार UPI मार्फत होत असतात.
१६ डिसेंबर २०१९ रोजी NEFT ची सुविधा २४ तास उपलब्ध करण्यात आली त्यावेळेस आपण NEFT आणि UPI बद्धल व्यवस्तीत सजून घेतले होते.तशी RTGS म्हणजे Real Time Gross Settlement ची सुविधा 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करताना सुद्धा वापरली जाते.
यामध्ये पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा नाही मात्र १० लाखांपर्यंतची रक्कम हस्तांतर करण्यास सहज परवानगी असते. तसेच यामध्ये आपण नेटबॅंकिंग करत असाल तर बॅंकेत न जाता ग्राहक आरटीजीएस द्वारे मोठी रक्कम हस्तांतरित करू शकता - ज्यावेळी UPI ने म्हणजे फोन पे गूगल सारख्या apps ने पेमेंट करताना अनेक मर्यादा येतात - अशा वेळी NEFT आणि RTGS चा मोठा वापर होतो.मात्र सध्या 'RTGS 'च्या माध्यमातून ग्राहकाला सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येतात.त्यामुळे रात्री आपले मोठे व्यवहार होत नाहीत. मात्र आता रिझर्व्ह बँकने केलेल्या घोषणे नंतर RTGS ची सुविधा सुद्धा १ डिसेंबर २०२० पासून २४ तास उपलब्ध राहणार आहे.ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकने दिलेली हि माहिती आणि हे नॉलेज अपडेट प्रयेक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
*दरम्यान आता रिजर्व बँकेने दिलेली* हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Post a Comment