स्टेट बँक ऑफ इंडियाने आज त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया |
स्टेट बँक च्या ग्राहकांना महत्वाच्या सूचना स्टेट बँक ऑफ इंडियाने आज त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले आहे सणासुदीच्या काळात काही खरेदी करताना. कोणताही खर्च करताना या चुका टाळा अन्यथा तुमच्या खिशाला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.
कुणाबरोबरही OTP, PIN, CVV आणि UPI PIN शेअर करू नका - अधिकतर फसवणुकीचे प्रकार फोन कॉल द्वारे ओटीपी किंवी सीव्हीव्ही दिल्यामुळे झाले आहेत.तुमच्या बँक खात्या संबंधित माहिती फोनमध्ये सेव्ह करणे टाळा. एसबीआयच्या मते, तुमचा बँक खाते क्रमांक,पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर किंवा त्याचा फोटो फोनमध्ये सेव्ह करण्यामध्ये जोखीम आहे. डिजिटल चोरी करणारे याचा वापर करून तुमच्या खात्यावर डल्ला मारू शकतात.
तुमचे एटीएम कार्ड केवळ तुम्हीच वापरले पाहिजे. ATM चे डिटेल्स कुणाबरोबरही शेअर करू नका -यामुळे तुमच्या परवानगीशिवाय खात्यातील पैशांमध्ये फेरफार होऊ शकतो.संवेदनशील माहिती जसे की, युजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी ची माहिती कधीही बँकेच्या प्रतिनिधींकडून विचारली जात नाही. त्यामुळे अशी माहिती घेण्यासाठी कुणाचा फोन आलाच तर तो नंबर ब्लॉक करा, त्यावर कोणतीही माहिती देऊ नका.
Post a Comment