Translate

इ आर पी म्हणजे काय ?

इ आर पी म्हणजे एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग व्यवसाय संस्थेतील संसाधननांचे नियोजन इ आर पी ही एक पद्धती आहे या पद्धतीद्वारे व्यवस्थापक कंपनीतील उपलब्ध माहितीचे एकत्रिकरण करतो व तिचे सुसूत्रीकरण करतो. अशी गोळा केलेली माहिती कंपनीच्या विविध कार्यामध्ये वापरून ती कार्ये अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जातो. कंपनीचे विविध कार्य पुढील प्रमाणे होत-उत्पादन, संशोधन, विकास, वितरण, विक्री वृध्दी,अकाऊटींग, मानव संसाधन इ. म्हणजेच  कंपनी संदर्भात उपयुक्त माहितीचे योग्य प्रकारे एकत्रिकरण करून कंपनीची विविध कार्य प्रभावीपणे व उत्कृष्टपणे करण्यासाठी खुप दिवस वापरली जाणारी  पद्धती म्हणजे इ आर पी होय.

इ आर पी म्हणजे काय
इ आर पी म्हणजे काय 


इ.आर पी हे एक सॉफ्टवेअर पॅकेज आहे. हे सॉफ्टवेअर व्यवसाय संस्थेची संघटनात्मक प्रक्रिया लक्षात घेऊन, व्यवसायाच्या विविध गरजा लक्षात आणून देते. व्यवसायाची विविध कार्य पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून विविध आवश्यक गोष्टी लक्षात आणून देण्याचे काम हे सॉफ्टवेअर पॅकेज करते. हे एक पॅकेज सॉफ्टवेअर असून कोणालाही एका व्यवसायासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर नाही. कोणात्याही प्रकारच्या उद्योग समूहातील व्यवसायाच्या गरजा हे सॉफ्टवेअर समजू शकते.


इ.आर.पी. या सॉफ्टवेअर मधे अनेक प्रकारच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. त्यापैकी काही महत्वाच्या प्रक्रिया पुढील प्रमाणे
  1. ऑर्डर प्रोसेसिंग
  2. ऑर्डर फुलफिलमेंट
  3. शिपींग
  4. इनव्हॉइसिंग
  5. बील ऑफ मटेरिअल प्रोसेसिंग (BOM) ६) परचेस ऑर्डर प्रोसेसिंग
  6. बॅलन्सशीट तयार करणे
  7. नफातोटा पत्रक तयार करणे इ.

वरील सर्व प्रक्रिया कार्य सर्व व्यवसाय संस्थांना लागू आहेत. आणि म्हणून हे सॉफ्टवेअर एवढ्या चांगल्या प्रकारे काम करते. व्यवसाय संस्थेची विशिष्ट गरज ही कस्टमायझेशन' प्रक्रियेतून जाणून घेतली जाते. इ.आर.पी. फक्त एक कार्यपूरता गरज निदर्शनास आणून देण्यापूरता मर्यादितनाही. तर व्यवसायातील सर्व महत्वाची कार्ये कमीत कमी श्रमात अर्थपूर्ण रितीने करुन देण्यासाठी गरज निदर्शनास आणून देण्याचे काम करते. इआरपी विविध फक्शनल मॉड्युल एकत्रित आणते. त्याची माहिती (data) एकमेकांचे देवाण घेवाण (Impor/ Export) करते. एवढेच नव्हे तर विविध कार्यामध्ये कोणती गोष्ट सारखी आहे हे देखील जाणते.म्हणजेच ज्या कार्यामध्ये एकाच प्रकारची माहितीची गरज असते, अशा सर्व कार्यामध्ये (फक्शनल मॉड्युल मध्ये) ही माहिती एकाच वेळी पोहचवली जाते. म्हणजे कोणत्याही एका मॉड्युल मध्ये एकदा माहिती पुरवली की ती माहिती आपोआप इतर (आवश्यक त्या) मॉड्युल मध्ये उपलब्ध होते. यामुळे माहितीच्या एकसंघपणा व सातत्य यात प्रगती होते.

इआरपी मध्ये प्रक्रियात्मक दृष्टीकोन

इआरपी मध्ये प्रक्रियात्मक दृष्टीकोन विचारात घेतला जातो. हा दृष्टीकोन कार्यात्मक दृष्टीकोनापेक्षा खूपच महत्वपूर्ण व प्रभावी ठरला आहे.व्यवसायातील विविध पद्धती व प्रक्रियांमध्ये खोलवर परिणामकारक ठरणारा प्रक्रियात्मक दृष्टीकोन अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरला आहे.असे हे अत्यंत महत्वपूर्ण सॉफ्टवेअर वापरण्यासाठी गरज आहे. कार्यकुशलतेची, कौशल्याची, उच्च क्षमतेची, उच्च साठवण कक्षाची, उच्च गतीची, विश्वासपूर्ण माहिती तंत्राची, तसेच या सर्व गोष्टी उपलब्ध व्हायला हव्यात योग्य त्या दरात.गेल्या दोन दशकांपासून अनेक इ आर पी सॉफ्टवेअर विक्रेते आमच्या भोवती आहे. परंतु मागील २/३ वर्षापासून इआरपी सॉफ्टवेअरने कंपन्यांमध्ये जास्त स्थान मिळविले आहे. विशेषत: गेल्या २/३ वर्षापासून भारतीय कंपनी जगतात हे सॉफ्टवेअर जागतिक दपिक्षाही जास्त गतीनेवापरले जात आहे. इआरपी हे अत्यंत खर्चिकसॉफ्टवेअर असून त्याच्या वापरण्याबद्दलचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय ठरतो. किंवा विभागात हा निर्णय घेतला जात नाही तर कंपनीतील उच्च स्थानस्थ व्यक्ती याचा निर्णय घेतात. इआरपी हे एकमेव अत्यंत खर्चिक असे सॉफ्टवेअर असून जे अत्यंत सामान्य महत्वपूर्ण निर्णयांसाठी वापरले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post