आता राज्यात बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची सुरवात.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना |
स्व .बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे.या यॊजनॆनुसार जखमींवर पहिल्या 72 तासांत संपूर्ण मोफत उपचार केली जाणार आहेत. हि खूप महत्वाची योजना आहे.
आज झालेल्या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या जखमीला वैद्यकीय उपचार मिळतील.रस्ते अपघातातील जखमीवर पहिल्या 72 तासांमध्ये मोफत उपचार केले जातील. यामध्ये आपण पण लक्षात घ्या कि आपल्या घरात घडलेले अपघात ,औद्योगिक तसेच दैनंदिन कामातील अपघात आणि रेल्वे अपघात यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही.
या योजनेतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे एखाद्या रुग्णालयाने रस्ते अपघात वीमा योजनेअंतर्गत जखमींवर उपचार करण्याचे नाकारल्यास किंवा कमी दर्जाची वैद्यकीय सेवा दिल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई होणार आहे.
अपघाता मध्ये जखमीं झालेयासाठी राज्यसरकाची हि योजना खूप महत्वाची ठरणार आहे.आपण थोडस सहकार्य करा इतरांना नक्की शेअर करा.
Post a Comment