आता सूनेला घराबाहेर काढता येणार नाही महिलांच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
नवरा-बायको |
सासू-सूनेच्या किंवा नवरा-बायकोच्या भांडणात घरगुती हिंसाचारातून अनेकदा सूनेला घराबाहेर काढलं जाते.हा ऐतिहासिक निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले देशात सध्या कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे.त्यातून महिलांना जबरदस्तीने किंवा वादातून घराबाहेर काढलं जातं.
पती राहात असलेल्या घरावर पत्नीचाही तेवढाच हक्क आहे. ते घर जरी भाड्याचे असेल किंवा पतीच्या नावे असेल दोन्ही ठिकाणी पत्नीचा हक्क पती एवढाच कायम असेल म्हणजे पतीचा हक्क असलेल्या अथवा पतीसोबत राहात असलेल्या घरातून सुनेला घराबाहेर काढता येणार नाही -असे सर्वोच्च न्यायलयाने आपल्या निर्णयात स्पस्ट केले.
सर्वोच्च न्यायलयाच्या तीन न्यायधीशांच्या खंडपीठासमोर हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायलयाने दिलेला हा खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे.
कोरोना च्या काळात भारतामधे लोक डाऊन घोषित करण्यात आला.सर्व फॅमिली एकाच घरात सोबत राहू लागली. त्याच्या मधे शुल्लक कारणावरून वाद होऊ लागला.या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये होऊ लागले.भांडणामुळे एकमेकांना मारण्याची हिंसा वाढू लागली.अशी माहिती मिळते की या लॉकडाउन मधे फारकत(तलाक) केस संख्या जास्त वाढली आहे.
काही ठिकाणी नवरा-बायकोमध्ये वाद शुल्लक कारणावरून होतात.आणि त्यांना घराबाहेर हाकलण्यात येते पण आता स्त्रिया त्यांच्या हक्कासाठी लाडू शकतात. आपण हि महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.
Post a Comment