विज्ञान आणि तंत्रज्ञान
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग गतिमान झाले आहे.पूर्वी धर्म हा मानवी संस्कृतीचा पाया समजला जाई, आज विज्ञान मानवी संस्कृतीचा पाया बनला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान |
विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे काय ?
तंत्रज्ञान, तंत्रज्ञान म्हणजे ज्ञानाचा व्यवहारातील उपयोग होय. निसर्गावर विजय मिळविण्यासाठी आणि मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे आणि यंत्रांचे ज्ञान म्हणजे तंत्रज्ञान होय. मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे आणि यंत्रांचे ज्ञान म्हणजे तंत्रज्ञान होय.
वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध म्हणजे विज्ञान आणि त्या शक्तीचा वापर करून, उद्योग करून तयार केलेले वाफेचे (रेल्वे) इंजिन म्हणजे तंत्रज्ञान होय.
प्राचीन काळात भारत, ग्रीक, इजिप्त, चीन यांनी गणित, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र यांमध्ये प्रगती केली होती. मध्ययुगात विज्ञानात फारशी प्रगती झाली नाही. (अपवाद - अरब) आधुनिक युगातील विज्ञान तंत्रज्ञानात कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, जेम्स वॅट, बेंझामीन फॅकलीन, लुई पाश्चर, अल्बर्ट आइन्स्टाईन इत्यादी शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे.
वरील माहिती यूपीएससी एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकते .
संगणक - माहिती आणि महत्त्व (Importance of Computer)
संगणक हा केवळ भारतीयांचाच नव्हे, तर जगातील सर्व मानवाचा परम (सुपर) मित्र बनला आहे,संगणकाच्या शोधामुळे कामाची गती वाढली आणि कामात अचूकता साधली आहे.कामाची गुणवत्ता वाढली आहे. माहितीची असंख्या स्रोत उपलब्ध झाले आहेत. माहितीचे जतन आणि संवर्धन हे संगणकामुळे शक्य झाले होते. यंत्रमानवाची निर्मिती ही संगणकामुळेच शक्य झाली आहे.
संगणक व तंत्रज्ञान |
संगणकाची माहिती संगणक आपणास हवी ती माहिती तयार करून देतो. (माहिती व डाटा पुरविल्यास त्यावर प्रक्रिया करून) संगणकांमध्ये माहिती साठवून ठेवणे, प्रक्रिया करणे, डिझाईन करणे, माहिती शोधणे इत्यादी क्षमता आहेत. ई-मेल द्वारे माहिती दुसरीकडे पाठविता येते.माहितीची कागदपत्रे मुद्रित करतो.
केंब्रिज विद्यापीठातील 19 व्या शतकातील संगणकतज्ज्ञ प्रा.चार्ल्स बॅबेज हे आधुनिक संगणकाचे जनक आहेत.डॉ. विजय भाटकर हे भारतीय परम संगणकाचे निर्माते आहेत.
संगणकाचे दोन भाग आहेत.
1) हार्डवेअर 2) सॉफ्टवेअर
१) हार्डवेअर - म्हणजे संगणकाचा पूर्ण वस्तूसंचय होय.
२) सॉफ्टवेअर - म्हणजे संगणकाच्या कार्यक्रमांना वापरला जाणारा कोश होय.
संगणकाचे प्रकार
1) मेन फ्रेम 2) सूक्ष्म संगणक 3) वैयक्तिक संगणक 4) मिनी कॉम्प्युटर 5) लॅपटॉप 6) सेवा प्रदाता
7) जडविलेले संगणक 8)भ्रमण संगणक 9) महासंगणक
संगणकाच्या क्षमता
1) वेग 2) अचूकता 3) सातत्य 4) स्मरणशक्ती 5) बहुउपयोगिता
संगणकाची वैशिष्ट्ये
चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
- डाटा स्वीकार : इनपूट
- डाटा प्रक्रिया - प्रोसेसिंग
- प्रोड्युसेस आऊटपूट : आऊटपूट
- साठविणे - स्टोरेज
संगणकाचे भाग
सी.पी.यू
1) ALU (ऑटोमॅटिक व लॉजिक युनिट) 2) कंट्रोल (नियंत्रण) युनिट
कम्प्युटरची मेमरी
- प्रायमरी (प्राथमिक) मेमरी
- सेकंडरी (दुय्यम) मेमरी
सेकंडरी मेमरीचे प्रकार : हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, झीप ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी, पेन डॉईल
संगणकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी संगणकाला जोडलेल्या साधनांना कम्प्युटर पेरिफेरल्स म्हणतात.ती साधने
- इनपूट डिव्हाइसेस.
- आऊटपूट डिव्हाइसेस
- कम्युनिकेशन डिव्हाइसेस आणि स्टोरेज डिव्हाइसेस ही आहेत.
संगणकतील विविध शेत्रातील उपयोग
- ई-गव्हर्नमेंट - आरोग्य, शिक्षण, जल, विद्युत, संरक्षण, राज्यकारभार, सेवासुविधा, विविध कार्यालये, उद्योग व्यवसायात ई-गव्हर्नमेंटचा वापर करतात.
- प्रकाशन चित्रकृती - मजकूर, आकृत्या, संगीत, चलचित्रे, बायनरी कोड चित्रे, रचना,वर्तमानपत्रातील माहिती छापणे इत्यादी
- अकौंटन्सी - व्यवहारातील पैशांच्या देवाण-घेवाण संबंधी नोंदी ठेवणे, सर्व जमा खर्चाच तक्ते तयार करणे, आर्थिक स्टेटमेंटस् तयार करणे इत्यादी.
- डाटा प्रोसेसिंग.
- शिक्षण ई-लर्निंग, स्लाईड-शो.
- मनोरंजन संगणकीय खेळ, गेम, चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके इत्यादी.
Post a Comment