Translate

राज्यात दोन शैक्षणिक वर्षे एकत्रित करा,शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शैक्षणिक वर्ष आणि शाळा चालू करण्यासंबंधी काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील त्याची माहिती आपण सविस्तर पाहू .




राज्यात कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.राज्यात लस आल्यावर सर्व विद्यार्थ्यांना प्रथम लस द्यावी तसेच आता परीक्षा हि थेट पुढील शैक्षणिक वर्षात ह्यावी.  तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात त्या वेळची परिस्थिती बघून घेण्यात याव्यात.


 यंदाचे शैक्षणिक वर्ष आणि पुढील शैक्षणिक वर्षाच्या दोन्ही एकत्रित करा  आणि राज्यात १ आगोस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान  यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहण्यासारखे असेल .राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे राज्यसरकार राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु करणार आहे. सुरवातीला ९ वी  ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु होईल असे सांगण्यात आले आहे. 


लोक डाऊन हे 25 मार्च पासून चालू झाले तेव्हापासून शाळा आणि कॉलेज बंद आहेत.Corona मुळे शाळा व कॉलेज बंद करण्यात आले होते.त्या सरकारने या लॉकडाउन मधे हा नियम घेतला होता की शाळा व कॉलेज ऑनलाइन घेतले जातील,पण काही क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी ची अडचण येत आहे .जसे की नेटवर्क सुविधा,महागडे इंटरनेट प्लान्स, एंड्रॉइड मोबाइल नाही, इत्यादि.इयत्ता पहिली ते दहावीचे अभ्यास हा टीव्हीवर प्रक्षेपित केला जातो.परंतु 11 वी,12 वी अभिनयंत्रीक, फार्मसिस्ट च्या विद्यार्थ्यांना खूप काही समस्या येत आहेत.त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे व पालकांचे म्हणणे असे आहे की ऑनलाईन शिक्षण समजत नाही आहे. जेव्हा करुणा वायरची लस येईल तेव्हा सर्वात पहिले ती शिक्षक वर्गाला व  विद्यार्थ्याला देण्यात यावी.आता नंतर पाहूया सरकार यावर काय नियम काढते.


Post a Comment

Previous Post Next Post