Translate

महाराष्ट्रात उद्यापासून सिनेमागृह सोबत अनेक गोष्टीना मिळणार परवानगी  राज्यसरकारकडून नवीन नियम.


राज्य सरकारने 5 नोव्हेंबरपासूनबसिनेमा हॉल, नाट्यगृहं तसंच मल्टीप्लेक्स सोबत अनेक गोष्टीना परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज संध्यकाळी पत्रकाद्वारे याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.


या नियमावलीनुसार कंटेनमेंट झोन वगळून राज्यातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव 5 नोव्हेंबर पासून खुले होतील.आता कंटेनमेंट झोन वगळून सर्व योग केंद्र सुद्धा 5 नोव्हेंबरपासून खुले होतील. तर सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेले एसओ पीयांना लागू असतील. त्याचबरोबर बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग रेज सारख्या  इन्डोअर खेळांच्या केंद्रांना सुद्धा 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

कंटेनमेंट झोन सोडला तर, सिनेमाहोल, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाटयगृहांना 50% टक्के उपस्थितीत सुरू करण्यास 5 नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे. मात्र याठिकाणी खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. तसेच याठिकाणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचं पालन करणे अनिवार्य असेल. 


दरम्यान राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी जारी केलेली हि गाईडलाईन्स प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे. आपण इतरांनाही अवश्य  शेअर करा.


Post a Comment

Previous Post Next Post