आपलं बचत खातं तसेच FD आणि RD च्या उत्पन्नावर कसा आकारला जातो कर.
बचत खाते |
आपण सेव्हिंगसाठी बचत खातं, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं सुरक्षित मानतो परंतु हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. या गुंतवणूक पर्यायांमध्ये जमा केलेल्या पेसा वर मिळणारं व्याज आयकरा विभाग अंतर्गत येतं - कारण या बचत योजनेतील व्याज इतर स्तोत्रांचे उत्पन्न मानलं जातं.
तुम्हला माहिती असेल आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत सहकारी संस्था,बँका तसेच पोस्ट ऑफिस बचत खात्यात Click Here आपण जी रक्कम ठेवतो. त्या ठेवींवर मिळणारं वार्षिक 10 हजार रुपयांपर्यंतचं व्याजच केवळ उत्पन्न करमुक्त राहते ज्याचा फायदा 60 वर्षांपेक्षा कमी व्यक्तीस दिला जातो.
बँक एफडीमधून मिळणाऱ्या व्याजावर बँकेकडून TDS कापला जातो. परंतु जर बँक FD तून वार्षिक व्याज उत्पन्न 40,000 रुपयांच्या मर्यादेमध्ये असेल तर TDS मधून सूट मिळण्याची तरतूद आहे. एफडी/आरडीच्या मर्यादेपेक्षा जास्त व्याज आल्यावर ते देखील बँकेद्वारा कापले जाते. त्यावेळी टीडीएसचा दर10% लावला जातो. पण जर PAN दिले नाही तर TDS दर 20 % होतो. तसेच महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत बचत खातं, एफडी, पोस्ट ऑफिस योजना तसेच सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या कोणत्याही प्रकारच्या ठेवींवर मिळणारं 50 हजार रुपयांपर्यंतचं व्याज हे करमुक्त आहे.
TDS बद्दल आपण याआधी सुद्धा माहिती घेतली आहे ,दरम्यान बँकेकडून टीडीएस कापला जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिक फॉर्म 15H जमा करावा लागतो. तसेच जे जेष्ठ नागरिक नाहीत त्यांना फॉर्म 15G जमा करावा लागतो. दर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा अर्ज भरल्यावर कर कापला जात नाही , म्हणजे हे फॉर्म एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या सूट उत्पन्नापेक्षा जास्त नाही हे दाखवण्यासाठी असतात.
आपण याच्या आणखी सविस्तर माहितीसाठी आपल्या बँके शाखेत भेट देऊ शकता , दरम्यान बँकिंग क्षेत्रातील हे नॉलेज अपडेट नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना अवश्य शेअर करा .
Post a Comment