Translate

Trading In Marathi, Trading म्हणजे काय? ट्रेडिंग चे प्रकार,
Trading In Marathi

किती तरी लाखो-करोडो लोक फक्त व्यापार म्हणजे (ट्रेडिंग) करून नफा मिळवतात. त्याचबरोबर काही लोकांचे नुकसानही होते. Trading करणे ला हिंदी मधे व्यापार असे म्हणतात. या पोस्ट मधे आपण व्यापार (trading) आणि गुंतवणूक(investment) यात काय फरक आहे? ट्रेडिंग किती प्रकारचे असतात? सर्व प्रश्नांची माहिती या पोस्ट मधे घेणार आहोत.



Trading म्हणजे काय? 

Trading म्हणजे, काही तरी वस्तू खरेदी करणे आणि नंतर वाढीव किंमतीवर विक्री करणे जेणेकरून त्या मधून आपल्याला नफा मिळू शकेल. शेअर बाजारात जसे शेयर्स खरेदी करणे आणि तितक्या लवकर त्या भावाची किंमत वाढते ते विकून नफा मिळवण्यासाठी यास स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणतात.


व्यापार आणि गुंतवणूक यात काय फरक आहे?

गुंतवणूकीतील शेयर्स बराच काळ होल्ड करावे लागतात साधारणता ते वर्षा प्रमाणे 5 वर्षे किंवा 10 वर्षे. परंतु व्यापारात आपल्याकडे शेअर्स फार कमी काळासाठी असतात. जसे 1 मिनिट, 1 तास किंवा काही महिने. गुंतवणूकीत आपण चांगल्या कंपन्यांचे शेअर्स काळजीपूर्वक खरेदी करतो. गुंतवणूकीत दीर्घ काळासाठी कंपन्यांचा समभाग असतो. व्यापार करताना आपण कंपनीचा तपशील जाणून घेतल्या शिवाय किंमत पाहून शेअर्स खरेदी करतो. कारण व्यापारात फक्त किंमतीच्या चढ आणि उत्तरा, हालचालीं घेणे देणे असतेअसते. जसे किंमत वाढत होतांना तसेच, आपण शेअर्सची विक्री करुन नफा कमवतो. Investment मधे पैसे कमावण्यासाठी खूप कालावधी लागतो परंतु रिस्क कमी असतो कारण invest करताना आपण चांगल्या आणि विश्वसनीय कंपनी वर पैसे लावतो. जर ट्रेडिंग ला पाहिला तर यामधे खुप लवकर पैसे कमावता येतात परंतु या रिस्क खूप असतो आणि टेंशन पण. कारण शेअर्स ची किम्मत खूप लवकर चेंज होत असते.


Investment म्हणजे काय?

गुंतवणूक आणि व्यापार यातला सर्वात मोठा फरक म्हणजे तुमचा दृष्टीकोन. जर आपण एखाद्या कंपनीचा अभ्यास केला असेल, त्याचा व्यवसाय समजला असेल आणि दीर्घकाळ कंपनी बरीच वाढेल, असा विचार सामायिक केला असेल तर आपण त्याला गुंतवणूक म्हणू शकतो.


Trading Mhanje Kay?

जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स फक्त किंमतीचे नमुने पाहता. कंपनीचा अभ्यास न करता केला असेल त्यामुळे जेणेकरून किंमत वाढली की आपण ती विकून नफा कमावू शकतो, मग आपण त्यास व्यापार म्हणू शकतो.



कंपनीचे निरीक्षण करून त्याचं अभ्यास करून व्यापार करणे यास फंडा मेंटल एनालिसिस म्हणतात. गुंतवणूकीपूर्वी आपण कंपनीचे मूलभूत विश्लेषण(फंडामेंटल एनालिसिस) केले पाहिजे. जर आपण फक्त कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींचा अभ्यास केला आणि त्याचा नमुना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला तांत्रिक विश्लेषण(टेक्निकल एनालिसिस) म्हणतो. ट्रेडिंग करण्याच्या वेळी टेक्निकल analysis करणे खूप गरजेचे आहे.

Trading मधे किती प्रकार असतात? (Types in Trading)

ट्रेडिंग मधे प्रमुख चार प्रकार असतात. स्कैल्पींग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोजीशन ट्रेडिंग हे चार प्रकार ट्रेडिंग मधे असतात. आता ट्रेडिंग च्या प्रकारच्या माहिती घेऊ. 

1. स्कैल्पींग ट्रेडिंग (Scalping Trading)

या प्रकारच्या ट्रेडिंग मधे आपण काही मिनिटांसाठी शेअर विकत घेतो किंवा होल्ड करतो. आणि किंमत थोडीशी वाढत असताना आपण त्या शेअरला विकून नफा कमावतो. उदाहरणार्थ जर आपण कंपनीचे 10 हजार शेअर्स 100 रुपयांच्या किंमतीवर विकत घेतले तर आणि काही मिनिटांनंतर जेव्हा शेअर्सची किंमत 100 रुपयांवरून 100.50 रुपयांपर्यंत वाढते, तेव्हा ती विका आणि 5000 रुपये नफा मिळवा. आशा प्रकारच्या ट्रेडिंगला स्कैल्पींग ट्रेडिंग म्हणतो.

2. इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading)

या प्रकारच्या ट्रेडिंग मधे आपण काही तास स्टॉक/शेअर ठेवतो आणि आणि त्याच दिवशी बाजार बंद होण्यापूर्वी शेअर विक्री करुन नफा कमवतो. या मधे एकचा दिवशी घेतले आणि विकले जातात.
 

3. स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)

हा ट्रेडिंग चा तिसरा प्रकार आहे. या प्रकारच्या व्यापारात आपण काही दिवसांसाठी शेअर होल्ड करतो आणि एक किंवा दोन आठवड्यात शेअर्सची विक्री करुन नफा कमावता येतो. 

4. पोजीशन ट्रेडिंग ( Position Trading)

हा ट्रेडिंग करण्याचा शेवटच प्रकार आहे. याला पोजीशन ट्रेडिंग म्हणतात. या प्रकारच्या व्यापारात आपण काही आठवड्यांपासून तर काही महिन्यांपर्यंत किंवा वर्षासाठी शेअर्स आपण आपल्या जवळ ठेवतो. आणि मग त्यांना विकून तुम्ही नफा मिळू शकता.


ट्रेडिंग करण्याआधी या गोष्टी लक्षात असू द्या 

प्रत्येक यशस्वी व्यापारी केवळ तेव्हा यशस्वी होतो जेव्हा तो आपला ट्रेडिंग सुधारत राहतो. जर तुम्हालाही यशस्वी व्यापारी बनू इच्छित तर या सर्व मुद्यांचे नीट पालन करा. तुम्ही नक्की एक दिवशी चांगला व्यापारी म्हणुन ओळखल्या जाल.


ट्रेडिंग मधून नियमित उत्पन्न मिळविणे पूर्णपणे शक्य आहे, पण सोपे नाही. व्यापारातून नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी आपल्याला प्रथम पैशांची आवश्यकता असेल. जर आपल्याला छोट्या किंमतीच्या हालचालींमधून पैसे कमवायचे असतील तर त्यामुळे आपल्याला अधिक शेअर विकत घ्यावे लागतील. जर तुम्हाला ट्रेडिंग विषयी अजून माहिती पाहिजे असेल तर कमेन्ट करून विचारू शकता. 

3 Comments

  1. सर्व माहिती दया

    ReplyDelete
  2. More About stock Market On https://sharermarketmarathi.blogspot.com/

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post